सिल्लोड शहरात ६५ मतदारांकडून पोस्टल मतदान

Foto
शहरातील ६१ मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य दाखल; तगडा पोलीस बंदोबस्त 

सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड शहरात होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणूकिसाठी एकूण ६८ पोस्टल मतदान होते त्यापैकी ६५ मतदारांनी सिल्लोड येथील औद्योगिक वसाहत आयटीआय येथील मतदान केंद्रावर सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान केले.

त्यात होमगार्ड असलेल्या ५० पैकी ५० मतदारांनी १०० टक्के मतदान केले. पुलिंग स्टाफ असलेल्या १५ पैकी १५ मतदारांनी मतदान केले. त्यात प्रभाग क्रमांक २,३,१२ मधील प्रत्येकी एका मतदाराने मतदान केले नाही. त्यामुळे ६८ पैकी एकूण ६५ मतदान झाले.

सोमवारी दिवसभर निवडणूक निर्वाचन अधिकारी निलेश अपार, सहायक निवडणूक अधिकारी
कारभारी दिवेकर, संजय देवराये यांनी एका क्लझर वाहनात बुथचे निवडणूक साहित्य ईव्हीएम मशीन व इतर साहित्य घेऊन एक केंद्राध्यक्ष व ४ कर्मचारी व ३ पोलीस कर्मचारी यांना साहित्य घेऊन खाना केले. एका मतदान केंद्रावर प्रत्येकी ५ कर्मचारी त्यात एक केंद्रप्रमुख ४ कर्मचारी त्यात १ महिलेच समावेश आहे. 

याशिवाय ऐन वेळी काही अडचण निर्माण झाल्यास ५० निवडणूक कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे  अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी निलेश अपार यांनी दिली.
सिल्लोड शहरात एकूण ६१ मतदान केंद्र आहे. १४ प्रभागात २८ नगर सेवक व एक नगराध्यक्ष निवडणूक द्यायचा आहे. 

त्यासाठी सिल्लोड शहरात प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. ३०० पोलीस कर्मचारी, अधिकारी, क्यूआर्टी फोर्स, सीआरपी पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय राखीव फोर्स ठेवण्यात आलीआहे. त्यात उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ दिनेश कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार सहित जिल्ह्यातील अधिकारी प्रत्येक घटना घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

प्रत्येक बुथबर गस्त पथक, संवेदनशील अति संवेदनशील मतदान केंद्रावर मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे कुणी गोंधळ करू नये बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करू नये कायदा हातात घेऊ नये नसता तुरुंगाची हवा खावी लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिला आहे.